शरद पवारांचे निकटवर्तीय देशपांडे यांच्या रोह्यातील फार्मवर छापा

अलिबाग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या रायगड जिल्ह्यातील रोहा येथील फार्मवर आयकर विभागाने आज छापा घातला. चार गाड्यांमधून आलेल्या आयकरचे अधिकारी व पोलिसांनी ही कारवाई केली. त्यात काय सापडले याचा तपशील मिळाला नाही. परंतु या कारवाईमुळे रायगडमध्ये खळबळ माजली आहे.


पुण्यातील सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. एफसी रोडवरील सिटी ग्रुपच्या ऑफिसवर छापे मारण्यात आले आहेत. देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित ८ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळ अ‍ॅमनोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे अधिकारी येथे झाडाझडती घेत असताना तिकडे रायगडमध्ये आयटीने मोठी कारवाई करीत रोहा केळतवाडी फार्मवर धाड टाकली आहे. जवळपास १४ वाहनांमधून आलेले आयकर विभागाचे अधिकारी व पोलिस देशपांडे यांच्या फार्मवर धडकले. त्यांनी फार्महाऊसची झडती घेऊन तपासणी केली.


अनिरुद्ध देशमुख हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. सिटी ग्रुप हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील आघाडीचा समूह आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी सिटी ग्रुपची स्थापना केली असून, ते या समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पुण्यात सिटी ग्रुपचे अनेक व्यावसायिक व रहिवासी प्रकल्प आहेत.

Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

“त्यांनी मला शिक्षकासारखे सगळे समजावून सांगितले”

मुंबई : क्रांती प्रकाश झा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट आणि वेब

'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता