ठाणे : ठाण्याचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह ५ माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या ट्विटने याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे असे झाले तर ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल.
ठाण्यात सुटलाय तुफान वारा, १२ तारखेला कुणाचे वाजणार बारा? बाळासाहेबांच्या सेनेकडे झुंडीने येऊ लागले, राष्ट्रवादीचे नगरसेवक कुणाला ‘आव्हाइड’ करु लागलेत?, असे म्हणत शिंदे गटाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ठाण्यामध्ये टप्प्याटप्याने संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी होणार, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
ठाण्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला भगदाड पाडण्याची तयारी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. आता ही खेळी यशस्वी झाल्याचे संकेत शिंदे गटाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. याआधी जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि पदाधिकारी यांना १ ते २ कोटीची ऑफर दिल्याचा दावा केला होता.
नरेश म्हस्के प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या आव्हाडांना अव्हॉईड करुन अनेक जण बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत येणार आहे. जितेंद्र आव्हाड सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. त्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. जितेंद्र आव्हाड यांना आपले नगरसेवक सांभाळता येत नाही. आधी आपले नगरसेवक सांभाळा आणि मगच आमच्यावर टीका करा, असेही म्हस्के म्हणाले.
नरेश म्हस्के पुढे म्हणाले, आव्हाड यांच्या जाचाला आणि त्यांच्या चांडाळ चौकडीच्या कंपूशाहीला कंटाळून प्रामाणिक नगरसेवक आमच्यासोबत येत आहेत. टप्प्याटप्याने संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी होणार. आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत तुम्ही जे ठाण्यात काम करू शकलात ते केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळेच, याचे भान ठेवा. असा सबुरीचा सल्ला म्हस्के यांनी आव्हाडांना दिला आहे.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…