Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सहॉटेल अंबिका@बदलापूर

हॉटेल अंबिका@बदलापूर

गिरीष शेट्टी नावाचा विशीतला युवक मामाबरोबर कर्नाटकमधून मुंबईत येतो. सुरुवातीला मामाच्या साथीने कारखान्यांमध्ये, कार्यालयात कॅन्टिन चालवायला घेतो. पुरेसा अनुभव आल्यानंतर बदलापूर पूर्वेला स्टेशनजवळ हॉटेल अंबिका चालवायला घेतो. याच अंबिका हॉटेलबाबतची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.

वर सांगितल्याप्रमाणे श्री. गिरीष शेट्टी यांनी हॉटेल चालवायला घेतल्यानंतर मॅनेजमेंट पूर्ण बदलली; परंतु पूर्वीच्या विश्वासाला तडा जाऊ न देता, पदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, वाजवी दरात त्यांनी पदार्थ उपलब्ध करून देण्याचे ठरवले. शुद्ध शाकाहारी पदार्थ देत यशस्वी सुरुवात केली. आजघडीला या हॉटेलमध्ये पंजाबी डिशेस, चायनीज डिशेस भरपूर व्हरायटीमध्ये मिळतात. शुद्ध शाकाहारीचा विचार केल्यास जवळजवळ ७० प्रकारचे पदार्थ त्यांच्याकडे आहेत. त्यातही ‘व्हेज मराठा’ ही डिश या हॉटेलची खासियत. जाडसर व्हेज ग्रेव्ही, त्यात ६ नग व्हेज टिक्की विशिष्ट मसाल्यात मुरवून, वरून चीजचा किस पसरवून सर्व्ह केली जाते. एका डिशमध्ये साधारण तीन व्यक्ती व्यवस्थित खाऊ शकतात. गरम रोटीबरोबर अथवा कुठल्याही प्रकारच्या भाताबरोबर (साधा, जीरा, शेझवान इ.) ही डिश खूप रुचकर लागते. शाकाहारीच्या अनुभवानंतर त्यांनी मांसाहारी विभाग सुरू केला. जी खासियत शाकाहारीची तीच मांसाहारीच्या बाबतीतसुद्धा. पूर्ण किचनच वेगळे. सर्व वस्तू, किचनमधले खाद्य जिन्नस, अगदी मनुष्याचा स्पर्शसुद्धा शाकाहारी पदार्थांना लागणार नाही, याची दक्षता घेतली जाते. मुळात मांसाहारी पदार्थ येथे सर्व्ह केले जात नाहीत. त्यांची फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा दिली जाते. इंडियन, पंजाबी व चायनीज व्यंजनांनी मांसाहारी किचन सज्ज आहे.

मांसाहारामध्ये बिर्याणी हे वैशिष्ट्य. ३० ते ४० प्रकारच्या बिर्याणी येथे तयार केल्या जातात. त्यातही चिकन चिली, बिर्याणी खासम खास. बिर्याणी सेवा प्लेट व िकलोच्या दरात उपलब्ध आहे. १ कि. चिकन बिर्याणी सहाजण व्यवस्थित खाऊ शकतात, असा या हॉटेलचा दावा आहे. अशा या बदलापूरकरांच्या हॉटेलमध्ये ए.सी. व नॉन ए.सी. सेक्शन उपलब्ध आहे. ए.सी. सेक्शनमध्ये एका वेळी ४० ते ५० ग्राहक सहज बसू शकतात. बर्थडे पार्टी, छोटे समारंभ येथे नित्याचेच आहेत. तेही अतिशय वाजवी दरात.

तेव्हा वाट कसली बघताय. या लवकर पार्टी करायला.

आपलेच, हॉटेल अंबिका…
रेल्वे स्टेशनजवळ,
बदलापूर (पूर्व)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -