काँग्रेसने देशाचे वाटोळे केले, मोदींचा विरोधकांवर घणाघात

नवी दिल्ली : राज्यसभेतील आजच्या भाषणावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसने देशाचे वाटोळे केले. देशाच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याऐवजी काँग्रेसने ६० वर्षात केवळ खड्डेच खड्डे खोदून ठेवले आहेत, अशी टीका मोदी यांनी सभागृहात केली.


मोदी पुढे म्हणाले, आमच्या सत्ताकाळात आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणींपासून पळण्याची आमची वृत्ती नाही. आम्ही त्यावर उपाय शोधणारे आहोत.


यावेळी विरोधकांनी 'मोदी-अदानी भाई भाई' अशी घोषणाबाजी केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींना पाठिंबा दर्शवला. पण या गोंधळात मोदींनी आपले भाषण सुरुच ठेवले. यावेळी विरोधकांचा अधिक समाचार घेत मोदींनी देशात कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान आहे, असा टोला लगावला. विरोधक जितके चिखल फेकतील तितकेच कमळ चांगले फुलेल, असे मोदी म्हणाले.


राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, खर्गेजी! फक्त कर्नाटकमध्ये एक कोटी ७० लाख जनधन बँक खाती उघडली आहेत. इतकेच नाही, त्यांच्याच कलबुर्गीमध्ये आठ लाखांपेक्षा जास्त जनधन खाती उघडण्यात आली आहेत. इतकी बँकेची खाती उघडली त्यामुळे लोक इतके जागरुक होत असतील तर आता कुणाचं खातं बंद होत असेल तर काय करायचं.. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्गे यांना लगावला.

Comments
Add Comment

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी