मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

  153

मुरूड: मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात शहरातील लेडिकुलसूम बेगम हॉस्पिटलमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संकल्प निरोगी महाराष्ट्राचा या शासनाच्या योजने अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


सदर आरोग्य शिबिरात बाल आरोग्य तपासणी, जागृत पालक सुदृढ बालक या योजनांचा शुभारंभ सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मकबुल कोकाटे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निशिगंधा माळी यांनी आरोग्य योजनांची माहिती दिली. या शिबिरामध्ये नेत्ररोग चिकित्सा, दंतरोग चिकित्सा, रक्ताच्या तपासण्या व गरजूंना औषध वाटप करण्यात आले.



यावेळी संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, शिवसेना शहरप्रमुख आदेश दांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य वने, दंत शल्यचिकित्सक डॉ.शेखर वानखेडे व रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. या शिबिराला शहरातील नगरपरिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. सर्व उपस्थितांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उषा चोले यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विठ्ठल शिंदे यांनी मानले.

Comments
Add Comment

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

Israel-Hamas: इस्रायली सैन्याचे गाझावर हवाई हल्ले! संघर्ष पुन्हा पेटला

हमासच्या नौदल कमांडरसह तीन सैनिक ठार इस्रायल सैन्याने (आयडीएफ)  पुन्हा गाझा येथे हवाई हल्ला करत हमासच्या नौदल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

हृदयद्रावक घटना: व्यायामादरम्यान 15 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रवीण धायगुडे (वय १५)