मुरबाड: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने संपूर्ण मुरबाड तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळा तसेच शिवळे येथे (काटा) महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबिरात तब्बल ७०० नागरिकांनी सहभाग नोंदविला.
यावेळी व्यासपीठावर मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद भंडारी, शिवळे प्राथमिक केंद्राचे अधिकारी डॉ भारती बोटे, डॉ. मुकेश पटेल, डॉ मुंडे, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ दळवी, तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, तालुका सचिव प्रा. धनाजी दळवी, प्रकाश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार, पंचायत समिती सदस्य अनिल देसले, मोहन भावथे॔, मुरबाड तालुका संघटक रेखा इमामे, शिवळे ग्रामपंचायत सरपंच निलिमा जाधव यांच्यासह बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी सुभाष पवार यांनी मार्गदर्शनही केले. या महाआरोग्य शिबिरात अनेक आजारांच्या तपासण्या केल्या गेल्या. कॅन्सर गोपाल कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि कॅन्सर हॉस्पिटलचे डोंबिवलीचे कॅन्सर डॉक्टर अनिल हेरुर यांनी येथे मोलाची भूमिका बजावली.