कल्याणच्या काळा तलावात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

कल्याण : राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे आपदा मित्र - सखी स्वयंसेवक यांच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू आहे. संपूर्ण ठाणे जिल्हात ५०० स्वयंसेवकांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यापैकी ठाणे येथून ११२ तसेच अंबरनाथ तालुक्यातून १०५ स्वयंसेवकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. उप विभागीय अधिकारी, प्रांत कार्यालय कल्याण व तहसीलदार कल्याण तालुका यांच्या समन्वयाने कल्याण तालुक्यात ३० जानेवारी पासून १० फेब्रुवारी पर्यंत सुरू असून अचिवर्स महाविद्यालय येथे बॅच क्र ५ आणि ६ मध्ये एकूण १२२ स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहेत. आज कल्याण पश्चिमेतील काळा तलाव येथे या प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्याक्षिके दाखविण्यात आले.


या शिबिरात पोलीस पाटील, नागरी संरक्षण दल, एनसीसी आणि एनएसएस, होमगार्ड, अग्निशमन दल, निवृत्त सैनिक अशा सर्वांच सहभाग आहे. शिबिरात पूर परिस्थिती बुडणाऱ्या व्यक्तीचा बचाव करणे व बोट चालवणे, गर्दी व्यवस्थापन व दंगल परिस्थिती साठी स्व सुरक्षेसाठी शिल्डचा वापर आणि लाठी चालवणे, प्रथमोपचार - बँडेज करणे, अग्नी सुरक्षा उपकरणे हाताळणी व मानवी स्ट्रेचर, दोरीच्या साहाय्याने डोंगर कडा चढणे-उतरणे, गाठींचे प्रकार, भूकंप, दरड कोसळणे, इमारत कोसळणे दुर्घटना व इतर आणीबाणी परिस्थिती हाताळणे अशा विविध विषयांवर प्रशिक्षण आणि सराव करण्यात आला. हे प्रशिक्षण यशदा चे मास्टर ट्रेनर, पोलीस अधिकारी, अग्निशमन अधिकारी, नागरी संरक्षण दल, प्रख्यात गिर्यारोहक यांच्याकरवी देण्यात आले.


या प्रशिक्षणासाठी उप जिल्हाअधिकारी अभिजीत भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार रीताली परदेशी व सुषमा बांगर तसेच ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ अनिता जावंजळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र सखी समन्वयक सुहास पवार, मैत्रेयी सापने, अभिजीत बाऊस्कर, कौशल पोतनीस, जयेश अहिरे, रोहित ठाकूर, यांनी मेहनत घेतली.

Comments
Add Comment

निवडणूक प्रचारासाठी भाजपची रणनिती ठरली !

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली

मुंबई : शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक ९ ऑक्टोबरपर्यंत, १०५

IND vs AUS: इंग्लंड, वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलची खरी परीक्षा

मुंबई: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट

माहीम मध्ये पुन्हा सुरू झालाय ‘सी फूड प्लाझा'

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून

२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस, अंतिम निर्णय २६ नोव्हेंबरला

नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) यजमान शहरासाठी भारताच्या 'अहमदाबाद'

ऐतिहासिक! ‘झवेरी बाजार’चा मुख्य रस्ता आता फक्त चालण्यासाठी खुला!

मुंबई : मुंबईतील खूप प्रसिद्ध असलेल्या झवेरी बाजारातून थेट मुंबादेवी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता, बाजाराच्या