कणकवली : कणकवली तालुक्यातील केनेडी येथे दोन गटात झालेल्या राजकीय राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या फिर्यादीवरून आमदार वैभव नाईक यांच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कणकवली पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.
कणकवली तालुक्यातील केनेडी बाजारपेठेत २४ जानेवारीला शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. भाजपचे शेकडो कार्यकर्ते केनडी बाजारपेठेत दाखल झाले. ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही कार्यकर्त्यांची या ठिकाणी जमवाजमव केली होती. आणि दोन्ही बाजूचे आक्रमक कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयांवर चालून गेले होते.
या राड्याच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांचा एक व्हिडिओ समोर आला. एक दांडा हातात घेऊन आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने जात असल्याचे यामध्ये दिसून येत आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
आंगणेवाडी जत्रोत्सवाचा पोलीस बंदोबस्ताचा पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाल्यानंतर आता कणकवली तालुक्यातील कनेडी राड्यामधील दोन्ही बाजूच्या काही संशयितांना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने कणकवली पोलिसांच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्या घटनेवरून दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाचे राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून आंगणेवाडी यात्रा व भाजपची आनंदोत्सव सभा या दोन्हीसाठी लागणारे पोलीस बळ या पार्श्वभूमीवर ही कारवाई थांबवण्यात आली होती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात सदर गुन्ह्यांमधील नावे नमूद असलेले दोन्ही पक्षांचे काही नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वतःहून पोलिसात हजर राहण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्याचे समजते. त्यामुळे आज रात्रीपासून किंवा उद्यापासून हे संशयित पोलिसात हजर होतील. किंवा रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेतले जाईल. त्या दृष्टीने पोलिसांकडून हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…