रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या मुलींना विजेतेपद

भोपाळ (वृत्तसंस्था) :मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेतेपदासह महाराष्ट्राने खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ मध्ये येथील ॲथलेटिक्सच्या शेवटच्या दिवसाची सोनेरी सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला दिवसभरात महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक, तर रिया पाटीलने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले.


महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, वैष्णवी कातुरे, रिया पाटील व अनुष्का कुंभार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्यांनी बॅटन बदलताना देखील चांगला संयम दाखविला. हे अंतर त्यांनी तीन मिनिटे ५२ सेकंदांत पार केले.


इस्लामपूर येथील खेळाडू श्रावणी हिने उंच उडीत १.६३ मीटर्सपर्यंत उडी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. ती सांगली जिल्ह्यातील खेळाडू असून इस्लामपूर येथे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. "पदक जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता", असे श्रावणी हिने सांगितले.


शेतकऱ्यांच्या मुलांकडे देखील खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची क्षमता असते, हे महाराष्ट्राच्या महेश जाधव याने दाखवून दिले. सातारा जिल्ह्यातील अबदरे या खेडेगावात जन्मलेल्या या खेळाडूने मुलांच्या लांब उडीमध्ये रुपेरी कामगिरी केली. त्याने ७.११ मीटर्सपर्यंत उडी मारली. खेलो इंडिया स्पर्धेतील त्याचे हे वैयक्तिक प्रकारात पहिलेच पदक आहे. त्याआधी त्याने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स शर्यतीतही रौप्य पदक मिळवून दिले होते. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर त्याने कनिष्ठ गटात ८० मीटर्स अडथळा शर्यत व लांब उडी या क्रीडा प्रकारात अनेक पदके जिंकली आहेत.


क्रीडा प्राधिकरणाच्या चाचणीमध्ये त्याने दाखवलेल्या कौशल्यामुळे त्याची मैदानी स्पर्धांसाठी सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षण केंद्रात निवड झाली. तेथे ज्येष्ठ प्रशिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ॲथलेटिक्समधील कारकीर्द सुरू झाली.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेन्काने गाठली अंतिम फेरी

मेलबर्न  :जागतिक क्रमवारीत नंबर १ टेनिसपटू अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

संजू सॅमसनऐवजी इशानला संधी?

टी-२० वर्ल्ड कपमध्ये उतरणारा भारताची तगडी सेना मुंबई  : येत्या ७ फेब्रुवारीपासून मायदेशात सुरू होणाऱ्या टी-२०

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद