विनोद कांबळीवर पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा, पत्नी अँड्रियाचे गंभीर आरोप

मुंबई: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या अडचणींत वाढ होणार आहे. विनोद कांबळी यांच्यावर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला आहे. त्याची पत्नी अँड्रिया यांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

वादग्रस्त माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून आर्थिक संकटात असल्याचे म्हटले आहे. काल त्याने आपल्‍या पत्नीला मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्याची अँड्रिया हिने आपल्‍या तक्रारीत पती विनोद कांबळी याने मारहाण केल्याचे म्हटले आहे.

विनोद कांबळी याने स्‍वयंपाकघरातील एक भांडे आपल्‍या अंगावर फेकले, असा आरोप अँड्रियाने केला आहे. या मारहाणीत अँड्रिया यांच्या डोक्याला दुखापत झाल्‍याची माहिती वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा