टेबल टेनिसमधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले

इंदूर (वृत्तसंस्था) : सुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावित महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. विशेष म्हणजे या विभागातील रौप्य पदक महाराष्ट्राच्याच तनिषा कोटेचा व रिशा मिरचंदानी यांना मिळाले. पुरुषांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जश मोदी व नील मुळ्ये यांनी कांस्यपदकाची कमाई केली.


महिलांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जोड्यांनी अंतिम फेरी गाठल्यामुळे दोन्ही पदके महाराष्ट्राला मिळणार हे निश्चित झाले होते. फक्त उत्सुकता होती कोणती जोडी आणि कशी जिंकणार याचीच. पृथा व जेनिफर यांनी तनिषा व रिशा यांचा १३-११, ११-९, ११-७ असा पराभव केला. तीनही गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी परतीचे फटके, चॉप्स, काउंटर ॲटॅक असा सुरेख खेळ केला आणि चाहत्यांना खेळाचा आनंद मिळवून दिला.


पुरुष गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत मोदी व मुळ्ये यांनी पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य व सौम्यदीप सरकार यांचा पराभव केला. सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या या जोडीने हा सामना ११-६, ११-५, ११-८ असा जिंकला.

Comments
Add Comment

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक

Shubham Gill : कुलदीपला का डावलण्यात आलं? शुभमन गिलने दिली मोठी माहिती; निर्णय योगय होता की नाही ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, इंग्लंडने २-१ ने भारतावर विजय मिळवला. या

Team India Zimbhave Tour : भारताचा युके दौरा संपला;आता झिम्बाब्वेविरुद्धचे पुढचे सामने कधी ?

मुंबई : इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर भारतासमोर आता झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करण्याची संधी आहे.

PV Sindhu : चायना ओपनमध्ये पीव्ही सिंधूकडे भारताचे नेतृत्व; सात्विक आणि चिरागची दुखापतीमुळे माघार

नवी दिल्ली : जपान ओपन सुपर ७५० विजेतेपद जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही

Mansukh Mandaviya : भारतात १५ जुलैपर्यंत डोपिंगची ७८ प्रकरणे; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. केंद्रीय