टेबल टेनिसमधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले

इंदूर (वृत्तसंस्था) : सुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावित महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. विशेष म्हणजे या विभागातील रौप्य पदक महाराष्ट्राच्याच तनिषा कोटेचा व रिशा मिरचंदानी यांना मिळाले. पुरुषांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जश मोदी व नील मुळ्ये यांनी कांस्यपदकाची कमाई केली.


महिलांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जोड्यांनी अंतिम फेरी गाठल्यामुळे दोन्ही पदके महाराष्ट्राला मिळणार हे निश्चित झाले होते. फक्त उत्सुकता होती कोणती जोडी आणि कशी जिंकणार याचीच. पृथा व जेनिफर यांनी तनिषा व रिशा यांचा १३-११, ११-९, ११-७ असा पराभव केला. तीनही गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी परतीचे फटके, चॉप्स, काउंटर ॲटॅक असा सुरेख खेळ केला आणि चाहत्यांना खेळाचा आनंद मिळवून दिला.


पुरुष गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत मोदी व मुळ्ये यांनी पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य व सौम्यदीप सरकार यांचा पराभव केला. सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या या जोडीने हा सामना ११-६, ११-५, ११-८ असा जिंकला.

Comments
Add Comment

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.