बेस्टच्या तुटीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

मुंबई : कोणतीही भाडेवाढ नसलेला आणि तोट्यात असलेला साल २०२३ - २४ च्या बेस्ट अर्थसंकल्पाला आज अखेर मंजुरी मिळाली. दोन हजार एक कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाला मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांनी आज मंजुरी दिली .


प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणाली अंमलात आणली आहे. तसेच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस पर्यावरणाच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. मात्र डिझेल, सीएनजीचे वाढते दर यामुळे बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला तोटा सहन करावा लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत प्रवाशांसाठी राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे बेस्ट उपक्रमाच्या महसुलात वाढ झाली आहे. भविष्यात बेस्ट उपक्रमाला होणारी तुट आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न असल्याचे बेस्ट महाव्यवस्थापकांनी सांगितले .



यंदाच्या अर्थसंकल्पात २५० कोटींनी तुट कमी


बेस्ट उपक्रमाच्या सन २०२३ - २४ च्या २ हजार १ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचे प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांना ३० नोव्हेंबर २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सादर केला होता. सन २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात २ हजार २३६. ४८ कोटींची तुट होती. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात २५० कोटींनी तुट कमी झाली असून बस मार्गांत व बस फेऱ्यांमध्ये केलेली वाढीमुळे महसुलातही वाढ झालेल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.



मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पांकडे सर्वांचे लक्ष


दरम्यान, नवीन वातानुकूलित बसेस खरेदीसाठी ७७४ कोटी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासह अन्य कामांसाठी २ हजार कोटी असे २,७७४ कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी बेस्ट उपक्रमाने पालिकेला केली आहे. येत्या ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टच्या पदरी काय पडणार याकडे बेस्ट उपक्रमाचे व प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल