प्रमोशन मध्ये रिझर्वेशन लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एनडीएच्या बैठकीत मागणी


नवी दिल्ली : अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार दर ५ वर्षांनी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत आठवले यांनी ही मागणी केली. यावेळी अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.


आगामी २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत एनडीएला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताने विजय प्राप्त होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला.


यावेळी ओबीसी आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याच्या विषयाकडे आठवले यांनी एनडीएच्या घटक पक्षांचे लक्ष वेधले.


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व राज्य सरकारने पदोन्नती मध्ये आरक्षण देणारा कायदा करणे आवश्यक होते. मात्र अनेक राज्यांत तसा कायदा झालेला नाही. त्यामुळे संविधानाच्या तत्वानुसार केंद्र सरकारने लवकरच दलित आदिवासी मागासवर्गीयांना नोकरीत पदोन्नती मधील आरक्षण देणारा कायदा करावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Comments
Add Comment

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर