ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील मुंब्र्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मुंब्र्यातील संजय नगर, शंकर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवसांत तब्बल ३५ जणांचा चावा घेतल्याची घटना रविवारी घडली आहे.
या कुत्र्याला पकडण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी पाचरण करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध सुरू होता. अखेर रात्री उशिरा या कुत्र्याला पकडण्यात ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला यश आले.
दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यात आता संजय नगर भागात एका पिसळलेल्या कुत्र्याने येथील नागरिकांना भयभीत करून सोडल्याचे दिसून आले.
या पिसाळलेल्या कुत्र्याने कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला चावा घेऊन पळ काढला. या भागातील सुमारे ३५ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याचे समजते.