मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा अखेर रद्द झाला आहे. जळगावमधील महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. परंतु आता ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने महाकुंभांचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाच्या समारोपाचा जळगावातील कार्यक्रम महत्त्वाचा आहे. मुंबई ते जळगाव हे अंतर फार असल्यामुळे ते रस्ते मार्गाने गेले तरी कार्यक्रमाला पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु अर्धा तासानंतरही बिघाड दुरुस्त न झाल्याने त्यांनी जळगाव दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्याच्या दिशेने तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर या निवासस्थानी रवाना झाले.
देशभरातील संतांच्या मार्गदर्शनामध्ये बंजारा समाज बांधवांची एकजूट व्हावी, व्यसनापासून तरुणांनी दूर राहावे तसेच बंजारा समाजाचे धर्मांतर रोखण्यासाठी अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून जामनेर तालुक्यातील गोदरी येथे महाकुंभाचे आयोजन केले आहे. आज या महाकुंभाचा समारोप होणार आहे.
या महाकुंभाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरु रामदेव बाबा उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राठोड देखील उपस्थित राहणार होते. परंतु आता जळगाव दौरा रद्द केल्याने ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजर राहतील.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात बिघाड होण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. याआधी ५ जानेवारी रोजी या विमानात बिघाड झाला होता. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे औरंगाबाद आणि पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्याचवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शिंदे आणि फडणवीस या दोघांनाही औरंगाबाद दौरा रद्द करावा लागला होता.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…