मुंबई: सोने दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ६४ हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आठवड्य़ाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सराफा बाजारात तेजी असल्याचे चित्र होते. सोन्याच्या दरात आज ३० जानेवारीला ९९ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर ५७ हजार २८८ रुपये झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारी ५७, १८९ रुपये होता. चांदीच्या दरात १४२ रुपयांची वाढ झाल्याने आता चांदीचा दर ६८ हजार ३३४ रुपये इतका आहे. २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ९१ रपयांची वाढ झाली आहे. ५२ हजार ४७६ प्रति १० ग्रॅमचा दर (Gold Price) आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड वेबसाईटवर २४ ते १४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर दिला आहे. त्याच्यासोबत १ किलो चांदीचा दरही दिला आहे. सेंट्रल बँकेने सोने खरेदी केल्याचा सकारात्मक परिणाम सोने दरावर दिसून येत आहे. त्यामुळे २०२३ मध्ये सोन्याचा दर ६४ हजारांपर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज अनुभवी सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.