शहापूर: वासिंद येथील मुंबई-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपूल (ओव्हर ब्रिज) ची उंची वाढवावी या मागणीसाठी येथील सर्वपक्षीयांकडून पुलाचे बांधकाम बंद करण्यात आले आहे.
वासिंद शहरात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडील दिशेने या महामार्गावर येथील चक्रधारी हॉटेल जवळ ओव्हर ब्रिजचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या या पुलाच्या कमी उंचीच्या कामामुळे या पुलाखाली ऐन पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना शहरात ये-जा करताना त्रासदायक ठरेल म्हणून या पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वासिंद पूर्व विभागाचे शहरध्यक्ष प्रकाश वाघमारे यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय संघटना पदाधिकाऱ्यांना आवाहन करून सदर पुलाचे काम बंद करण्यात आले आहे. दरम्यान, पुलाची उंची वाढविण्याची असलेली मागणी पूर्ण करावी अन्यथा सर्वपक्षीय माध्यमातून उपोषण करण्यात येणार येईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे.