प्राणी कल्याण सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम

ठाणे:  ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उद्या ३० जानेवारीला ६ ते ८ वीच्या निवडक विद्यार्थ्यांची येऊर येथील गोशाळेत भेट आयोजित केली आहे. जीवजंतू कल्याण दिवस आणि प्राणी कल्याण पंधरवडा सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्ताने सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

श्री पशुरक्षक मंडल ट्रस्ट येऊर, येथे या विद्यार्थ्यांना गोवंश, म्हसवंश जनावरांकडुन प्राप्त दुध व पदार्थांंची माहिती दिली जाईल तसेच गोशाळेमध्ये तयार होणाऱ्या बायोगॅस, विविध औषधे, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने, अगरबत्ती आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे.

कुत्रा किंवा साप चावल्यानंतर करावयाचे प्राथमिक उपचार, प्लास्टिक उत्पादनांचा पक्षी प्राणी यांच्यावर होत असलेला परिणाम याचीही माहिती दिली जाईल. तसेच भटक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या व भटके कुत्रे दत्तक घेणाऱ्या नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे