Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीप्रवासादरम्यान विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

प्रवासादरम्यान विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

इंडिगोमधून प्रवास करणारा इसम पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: विमान प्रवासा दरम्यान आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव असून नागपूर येथून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) विमानात तो प्रवास करत होता.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोचे हे विमान मुंबईकडे २४ जानेवारी सकाळी ११.०५ वाजता रवाना झाले हे विमान मुंबई विमानतळावर १२.३० च्या सुमारास उतरत असतानाच विमानाचे आपात्कालीन दरवाजे कोणीतरी उघडण्याचा प्रयत्न केल्याचे निर्देश वैमानिकास मिळाले. या माहितीच्या आधारे लगेचच विमानातील सहकर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यावर इमर्जन्सी गेटच्या हँडलचे कव्हर उघडण्यात आल्याचे लक्षात आले.

त्याच्याविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भांदवि ३३६ तसेच एअरक्राफ्ट कायदा १९३७ अनुसार विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना विमान उतरण्यापुर्वी लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर या प्रवाशाविरुद्ध तक्रार देण्यात आली. वैमानिक, सहवैमानिक आणि सह प्रवाशांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित प्रणव राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -