मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जरा जपून शब्द वापरावे, अशा प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिला आहे. मात्र हाच सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मानला असता, असे प्रत्युत्तर देत संजय राऊत हे आपल्या खिजगणतीतही नाहीत हे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखवले आहे.
शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, या प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या वक्तव्याला विरोध केला जात आहेत.
शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आमची युती ही शिवसेनेसोबत आहे. उद्धव ठाकरे आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत युती करणार नाही.’ पुढे राऊतांनी दिलेल्या सल्ल्याबाबत आंबेडकर म्हणाले की, ‘जपून बोलण्याचा सल्ला जर उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मानला असता.’
शरद पवारांसंबंधित केलेल्या विधानाबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘मी ते विधान इतिहासामधील काही घटनांवरून केले होते. सद्यपरिस्थितीशी त्याचा काहीही संबंध नाही. जर कोणी त्या विधानाला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर मी त्याला काही करू शकत नाही.’
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…