भिवंडी : भिवंडी शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार या भागात रस्त्यालगत असलेल्या मूलचंद कंपाऊंड येथे एका इमारतीचा पुढील काही भाग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला.
पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत इमारती लगत रस्त्याकडेला आठ दुकानाचे गाळे बनवण्यात आले होते. या दुकानांवर इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली. यावेळी कपड्याचे दुकान असलेल्या गाळ्यामध्ये दुकानचालक माजिद अन्सारी (वय २५) हा झोपलेला असल्याने त्याच्यावर इमारतीचा ढिगारा कोसळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळतात भिवंडी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी ढिगारा उपसून त्यामध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. पण कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अशा घटना घडत असतात. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…