पोलीस शिपाई व चालक पदांसाठी उच्चशिक्षितांचे अर्ज!

राज्यातल्या बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव उघड!



  • अनिकेत देशमुख


भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव आता पुन्हा एकदा समोर आले आहे. संपूर्ण देशात बेरोजगारीची परिस्थिती अशी आहे की उच्चशिक्षित पदवीधर उमेदवारही शिपाई व चालक पदाच्या नोकरीसाठी अर्ज करत असल्याचे चित्र दिसत आहे. मिरा-भाईंदर, वसई विरार येथील पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी भरतीसाठी बीटेक, एमबीए, पीएचडी, एमएससी आणि एमटेक केलेल्या उमेदवारांनीही या भरतीसाठी अर्ज केले असल्याची माहिती पोलीस आयुक्तलयामार्फत देण्यात आली.


मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी ९९६ पोलीस पदांसाठी ही भरती सुरू आहे. या पदांसाठी सुमारे ७४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वाहन चालक पदाकरता एकूण १० जागा असून पोलीस शिपाई पदासाठी ९८६ जागा आहेत.


कोरोनाच्या काळानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या असून व्यवसाय देखील बंद पडले आहेत. मोठमोठ्या पदव्या घेऊन शिक्षण पूर्ण करून देखील तरुणवर्ग बेरोजगार असल्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उच्चशिक्षितांनी देखील पोलीस भरतीच्या शर्यतीत भाग घेतला आहे.


मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयातील पोलीस भरती मध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात बीटेक(१४१), एम.ई (४), बी.ई (३७१), एम.बी.ए (४५), बी.बी.ए (८१), बी.फार्म (५०), बी.कॉम (४४७३), एम कॉम (५२९), एम.एस.सी (२७९), बी.एस.सी(३९५२), एल.एल.बी (१०), एम.ए (१७३७), बी.ए (१४,८४३), बी.बी.एम (२४), बी.सी.ए(२६८), बी.एड (८), बी.एम.एस (६४), बी.पी.एड (२०), एम.पी.एड(३), बी.सी.एस (१५८), बी.एस. डब्ल्यू (३१), एम.एस.डब्ल्यू (४१) असे उच्चशिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षितांचे पोलीस भरतीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी किती उच्चशिक्षितांचे नशीब उजळणार असून भरती करता पात्र ठरणार आहेत हे भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कळणार आहे.


दरम्यान, भरती प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद, अचूक व पारदर्शक होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे वेळ आणि श्रम कमी होणार आहे. भरतीसाठी कोणीही पैशांची मागणी करत असेल तर उमेदवारांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रकाश गायकवाड, उपायुक्त, मुख्यालय, मिरा-भाईंदर, वसई विरार यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Pakisthan Team Clash : वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानच्या कोच आणि कर्णधारामध्ये वाद ; नेमकं घडलं काय ?

Mumbai: आयसीसी टी- २० वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) २०२६ मधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तान महिला संघात

FIFA World Cup 2026 : वर्ल्ड कप दरम्यान फिफाची कडक कारवाई! या आशियाई देशावर घातली बंदी !!!

फ्रान्स : फिफा वर्ल्ड कप २०२६ चे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांनी संयुक्तपणे आयोजन केले आहे. स्पर्धेतील

Prahar The Ujjwal Nikam Story: 'प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी'चा टीझर रिलीज; ललित प्रभाकरची अवतार पाहून चाहते थक्क

मुंबई : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी घटनांपैकी एक मानला जातो. या

3 Idiots 2 Update : 17 वर्षांनंतर पुन्हा रंगणार मैत्रीचा प्रवास ? रँचो, फरहान आणि राजूच्या पुनरागमनाबाबत राजकुमार हिरानींचा मोठा खुलासा

3 Idiots 2 Update : ‘3 इडियट्स' प्रदर्शित होऊन १७ वर्ष झाली असली तरी आजही प्रेक्षकांच्या मनात आजही चित्रपट घर करून आहे.

Mirzapur The Movie Teaser : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा धमाकेदार टीझर रिलीज

Mirzapur The Movie Teaser : 'मिर्झापूर' चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून 'मिर्झापूर: द मुव्ही'चा (Mirzapur The Movie) बहुप्रतीक्षित टीझर