ऑनलाईन जेवण मागवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता झोमॅटोने फ्री डिलिव्हरी सेवा सुरु केली आहे. मात्र, यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे.
झोमॅटो या फुड डिलिव्हरी अॅपने मार्च २०२२ मध्ये १० मिनिट फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली होती. ही सेवा झोमॅटो इन्स्टंट म्हणून ओळखली जात होती. दिल्ली एनसीआर आणि बंगळुरू येथे या सेवेला सुरुवातही झाली होती. मात्र, कंपनीला ही सेवा देण्यात अनेक अडचणी येत होत्या.
१० मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी कंपनीला कमी ऑर्डर मिळत होत्या. त्यामुळे कंपनीने जाहीर केले की, ही डिलिव्हरी सेवा थांबवण्यात येणार नाही. परंतु या सेवेचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला तीन महिन्यांसाठी १४९ रुपये मोजावे लागतील. दरम्यान या सेवेद्वारे फुड ऑर्डर करणाऱ्यांना १० किमीच्या रेडियसमध्येच अनलिमिटेड फ्री डिलिव्हरी मिळेल.
यासाठी तुम्हाला झोमॅटो गोल्डची मेंबरशीप घ्यावी लागेल. यामध्ये यूझर्सला मोफत डिलिव्हरी (१० किमीच्या रेडियसमध्येच), विनाविलंब डिलिव्हरीची हमी, गर्दीच्या वेळी व्हीआयपी अॅक्सेस आणि इतर अनेक ऑफर्स देखील देण्यात येतील.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…