वीजचोरी करणाऱ्या जीन्स वॉशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण (वार्ताहर) : उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने वीजचोरी पकडलेल्या जीन्स वाशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टिटवाळ्यातील गुरवली पाडा स्थित या कंपनीने मीटर बायपास करून तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. जागामालक व कंपनीच्या चालकाविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये मुरबाड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.


वीज ग्राहक विकास बबन दळवी व वापरकर्ता ब्रिजमोहन प्रजापती अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पथकाने १७ जानेवारीला गुरवली पाड्यातील काळू नदी ब्रिजजवळील क्रमांक ५३६/१३ गाळाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. सखोल तपासणी केली असता मीटरकडे येणारी केबल छतावर कट करून टॅपिंग केल्याचे आढळले. मीटर टाळून टॅपिंग केलेल्या केबलच्या साहाय्याने वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार वीजचोरीचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. मात्र विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे पुढील तपास करीत आहेत.


या कारवाईत सहाय्यक अभियंते धनंजय पाटील, अभिषेक कुमार, कनिष्ठ अभियंता अपर्णा शेलार-सकपाळ, तंत्रज्ञ विजय बावणे, बाह्यस्त्रोत कर्मचारी जयेश वावरे यांनी सहकार्य केले.

Comments
Add Comment

ठाण्याच्या मेट्रोचे डिसेंबरमध्ये होणार उद्घाटन, 'या' मार्गावर धावणार मेट्रो

ठाणे : ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा डिसेंबर २०२५ मध्येच सुरू होणार आहे. उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

प्रायोगिक तत्वावर बदलापूर-अक्कलकोट बससेवा

बदलापूर  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे.

भिवंडीत शनिवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

भिवंडी (वार्ताहर) : जुनी भिवंडीला पाणीपुरवठा करणारी मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टींगचे काम हाती घेण्यात येणार

बदली आदेशानंतरही ठामपाचे १७० कर्मचारी त्याच विभागात

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेचा अनागोंदी कारभार वारंवार उघड होत आहे. ठामपाच्या अतिक्रमण विभागातील १७०

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

आजपासून ९ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात

पाण्याचा काटकसरीने वापर करा : ठामपाचे आवाहन ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतर्फे पिसे, पांजरापूर येथील