औरंगाबाद : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र त्यानंतर आता रब्बीच्या हंगामात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे रब्बीच्या पीकांना मोठा फटका बसला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नसून, २५ जानेवारी रोजी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान देखील तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
गव्हाच्या पीकांना सर्वाधिक फटका बसला असून, औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाचे पीक आडवे पडली आहेत. प्लॉटचे प्लॉट आडवे झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे. त्यातच आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…