‘त्या’ कंपनीतील कामगार कामावर रुजू

बोईसर(वार्ताहर) : महिन्याभरापासून विविध मागण्यांसाठी चाललेल्या कंत्राटी कामगारांचा संप अखेर किसान मोल्डिंग कंपनी मालक, कामगार आयुक्त, पोलिसांच्या मध्यस्थीने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करीत मंगळवार, २५ जानेवारी रोजी संपला, यानंतर सर्व कामगार कामावर रुजू झाले. तसेच माथाडी आणि जनरल कामगार संघटनेला कामगारांनी लेखी पत्र देत रामराम ठोकला आहे, त्यामुळे कंपनीत आंदोलन करणारी युनियन बरखास्त झाली आहे.


बोईसर पूर्वेकडील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील किसान मोल्डिंग्ज कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी २१ डिसेंबर २०२२ ते २३ जानेवारी २०२३ पर्यंत कामगार नेते सुशील चुरी यांच्या चिथावणीने कंपनीमध्ये संप केला होता. संपामुळे सुरळीत असलेल्या उत्पादन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. कंपनीमध्ये काम करणारे कंत्राटी कामगारांमध्ये स्थानिकांची संख्या मोठी आहे, महिलांचाही समावेश आहे़ कामगार अनेक वर्षांपासून कंपनीत आनंदाने कार्यरत आहेत. कामगार नेते सुशील चुरी यांनी दिशाभूल केल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. आंदोलनामुळे कंपनीचे नुकसान झाले असून, कामगारांना वेतन न मिळाल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.


कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे, पोलीस उपनिरीक्षक विजय डाखोरे आणि किसान मोल्डिंग्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव अग्रवाल यांच्या उपस्थितीत कंत्राटी कामगारांसोबत बैठक पार पडली. हे कामबंद आंदोलन सामंजस्याने सोडविण्यात येणार असल्याचे सांगत कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य करणार असल्याचे आश्वासन अग्रवाल यांनी दिले.


कामगार नेते चुरी यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून कामगारांने नुकसान झाले. कामगारांना बेकायदेशीर संप करण्यासाठी प्रवृत्त केल्याने कामगारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आल्यानंतर मंगळवार(ता.२४) पासून कंत्राटी कामगारांनी स्वेच्छेने कामगार संघटनेमधून राजीनामा दिल्याची घोषणा केली. यानंतर सर्व कंत्राटी कामगार कामावर परतले असून, कंपनीत उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे़ कामगार आयुक्त, स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीबाबत किसान मोल्डिंग्स लिमिटेडच्या व्यवस्थापनाकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Comments
Add Comment

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी