नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वार १० लाख कर्मचार्यांसाठी ‘रोजगार मेळावा’ भरती मोहिमेअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये सुमारे ७१ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली.
१० लाख तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी २०२२ मध्ये पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ‘रोजगार मेळा’ मोहिमेचा हा एक भाग आहे. नियुक्ती पत्रांचे वितरण केल्यानंतर, पंतप्रधानांनी काही उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांनी त्यांचा जीवन प्रवास शेअर केला.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले. ‘रोजगार मेळा’ पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
नियुक्तीपत्रे मिळालेले युवक कनिष्ठ अभियंता, लोको-पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लघुलेखक आणि कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर आणि सुरक्षा अधिकारी या पदांसाठी पात्र आहेत. देशभरातील विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती केली जाईल.
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…
मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…