अभिनेत्री राखी सावंत अटकेत

Share

मॉडेलचा अश्लिल फोटो वायरल केल्याचा आरोप

मुंबई : अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीनंतर आता आंबोली पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला अटक केली आहे. स्वतः शर्लिनने ट्विटरवर यासंबंधीची माहिती दिली. राखी आज दुपारी पती आदिल दुर्रानीसोबत तिच्या डान्स अकादमीचे उद्घाटन करणार होती. पण याआधीच तिला शर्लिन चोप्रा प्रकरणात पोलिसांनी अटक केले.

शर्लिन चोप्राने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘आंबोली पोलिसांनी एफआयआर ८८३/२०२२ प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा एबीए १८७०/२०२२ अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. नोव्हेंबर २०२२ मध्ये शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती. यासोबतच पत्रकार परिषद घेत राखीने तिचा अश्लील व्हिडिओ दाखवत असभ्य भाषा वापरल्याचा आरोप शर्लिनने केला होता.

दरम्यान, सध्या राखीची आई रुग्णालयात दाखल आहे. ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त असलेल्या राखीच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. राखी तिच्या आजारी आईच्या प्रकृतीचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, यात राखीचा आईसोबतचा रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती आईच्या चिंतेने रडताना दिसत आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य तिला सांत्वन देताना दिसत आहेत.

मात्र लोकांना तो व्हिडिओ आवडला नसून त्यांनी राखीला खाजगी गोष्टी सार्वजनिक करण्यासाठी ट्रोल केले. यासोबतच राखीने सात महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर आदिल दुर्रानीशी मुस्लिम प्रथेनुसार लग्न केले. काही दिवसांपूर्वी आदिल राखीशी कोणत्याही प्रकारे लग्न न झाल्याचे बोलत होता. मात्र नंतर त्याने राखीसोबत लग्न केल्याचे मान्य केले आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. आता राखीने बीग बॉस कार्यक्रमात गरोदर असल्याचे सांगितले होते, त्याच्याही बातम्या येत आहेत. त्यातच आता तिच्या अटकेच्या वृत्ताने सोशल मीडियावर राखीला ट्रोल केले जात आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

34 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

9 hours ago