शिवराज राक्षेला महाराष्ट्र केसरीची गदा
पुणे : शिवराज राक्षेने एकहाती विजय मिळवत महाराष्ट्र केसरी २०२३ होण्याचा मान मिळवला आहे.
पुण्यात रंगलेल्या ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी २०२३ होण्याचा मान पटकावला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला काही मिनिटातच थेट चितपट करत विजय मिळवला. तर महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी ठरला आहे.