पंतप्रधान मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर

मोदी यांच्या हस्ते मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ चे लोकार्पण होण्याची शक्यता


मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ चे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.


मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजपने मिशन २०२४ च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली असून मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केले आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.


अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय बाकी आहे.


दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील पंतप्रधान जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष उपस्थित नाही राहिले तर ऑनलाईन तरी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची

शिर्डी अ‍ॅसिड हल्ल्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद - आरोपीला कठोरातील कठोर शासन करणार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ग्वाही

मुंबई : शिर्डी जवळील लोणी येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेने राज्य हादरले

शिष्यवृत्ती थेट संस्थांच्या खात्यात जमा करण्याबाबत शासन सकारात्मक

शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार; मंत्री संजय शिरसाट यांचे विधानपरिषदेत आश्वासन! मुंबई: महाराष्ट्र

मुनगंटीवारांच्या पुढाकारामुळे मजूर व महिला सहकारी संस्थांना मिळणार बळ

मुंबई : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यातील मजूर सहकारी संस्था सोबतच प्राधान्याने महिला

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता