...तर रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे संजय राऊतला चप्पलेने मारतील : नारायण राणे

मुंबई : शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतने घेतलेली आहे. संजय राऊत हा राजकारणातला जोकर आहे, अशी घणाघाती टीका करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे.


उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडपतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली. तसेच संजय राऊत जिथे बोलावतील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार आहे, असेही जाहीर आव्हान त्यांनी राऊत यांना दिले आहे.


शिवसेनेच्या १९ जून १९६६ पासून पहिल्या ४० वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली नाही. ती संजय राऊतने घेतलेली आहे. आज त्याला शिवसेना संपवल्याचा आनंद होत आहे. ५६ आमदार होते आता १२ पण राहिलेले नाही. संजय राऊतचे एकतरी विकासात्मक काम सांगा. संपादक म्हणून त्यांनी लिहिलेला एकतरी बौद्धीक लेख दाखवा. लेखातून शिव्या देण्यापलिकडे काही काम तो करत नाही.


एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. कशासाठी माहित आहे का? मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत राज्यसभेत येऊन माझ्या बाजूला बसायचा आणि उद्धव ठाकरे तसेच रश्मी ठाकरे यांच्याबाबत जे काही सांगायचा ना ते उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. त्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकून रश्मी आणि उद्धव ठाकरे यांनी संजयला चप्पलेने नाही मारलं तर मला विचारा, अशी टीका राणे यांनी केली.



'संजयने ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो संपला समजा'


"शिवसेना संपवण्याची सुपारी मी नाही तर संजय राऊतने घेतली आहे. शिवसेना संपवली याचा त्याला आनंद होत आहे," असा दावा नारायण राणे यांनी केला. "हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा आहे. संजयने ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो संपला समजा. असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे तुम्ही संजय राऊतबद्दल विचारु नका, असे राणे म्हणाले. संजय राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारा विष असल्याची टीका राणे यांनी केली.



जिथे बोलावशील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार


जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर नारायण राणे म्हणाले की, "मी मला सुरक्षा मागितलेली नाही. मला आज नाही तर १९९० पासून संरक्षण आहे. तेव्हा तो शिवसेनेत नव्हता. तो शिवसेनेविरुद्ध लोकप्रभामध्ये लेख लिहित होता. पण आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलावशील तिथे मी सर्व सुरक्षा सोडून यायला तयार आहे."



'संजय राऊत हे राजकारणातले जोकर'


आजच्या राजकारणाला संजय राऊत हा जोकर आहे. शिव्या घालण्यापलीकडे तो काही करत नाही. त्याने सामाजिक, आर्थिक, धार्मिक असे कोणतेच काम केलेले नाही, असे नारायण राणे म्हणाले.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक