त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवसांसाठी बंद

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस बंद राहणार आहे. अतिप्राचीन असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत मंदिर बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.


मंदिराच्या संवर्धनाचे काम होणार असून, ते भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे, असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. तसेच, शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याचे, दिसून येत असून हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीदेखील शिवलिंगाची झीज होत असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराची देखभाल दुरुस्तीसाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

कोल्हापूरमधील ‘ईव्हीएम स्ट्राँग रूम’ बाहेरील सीसीटीव्ही हटवल्याप्रकरणी सखोल चौकशी होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सरकारने घेतली गंभीर दखल

नागपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या पेठ-वडगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम स्ट्राँग

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास