
मुंबई : नव वर्षाच्या पूर्वसंध्येला भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत नव वर्षातील आपले टॉप ५ नवे निशाणे जाहीर केले आहेत. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावे जाहीर केली आहेत.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1609017427043713025
नव्या वर्षात नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे. याबाबतचे ट्विट करत त्यांनी ५ नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासह १९ बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान यांचे ४९ स्टूडिओ आणि ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए घोटाळ्याचाही उल्लेख किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.