भारतात मास्क बंधनकारक करण्याची शक्यता; आज महत्वाची बैठक

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहा:कार माजवला आहे. चीनमध्ये कोविड रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात उद्रेक होऊ नये. यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या


आज होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे, तसेच या बैठकी दरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. जगात आठवडाभरातच कोरोनाची ३६ लाख रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारत अलर्ट मोडवर असून पवार यांनी नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.


भारती पवार म्हणाल्या, भारतात दोन वर्षापूर्वी कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जीवघेण्या महामारीने संपूर्ण देश ठप्प झाला होता. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात आज त्याच पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होण्यास सुरुवात होणार आहे. कोरोनासारखी गंभीर परिस्थिती वेशीवरच थोपवण्यासाठी आज केंद्राची वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे.

Comments
Add Comment

S-400 Air Defence Systems : भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार! रशियाकडून आणखी ५ 'S-४००' आणि 'पँटसिर' क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीला मंजुरी

नवी दिल्ली : मध्य-पूर्व आशियात सध्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 'कामिकाझे' (Kamikaze) ड्रोनचा वापर करून युद्ध पेटलेले

Gujrat Viral Video : काळ आला होता पण वेळ...गुजरातच्या वलसाडमधील लिफ्टचा भीषण अपघात; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

वलसाड : गुजरातच्या वलसाड येथील 'सरदार हाईट्स' या गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलात आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.