Grampanchayat election : ग्रामपंचायत निवडणूक निकालात चुरस!

मुंबई : राज्यभरातल्या ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat election) येण्यास सुरुवात झाली असून मविआ आणि भाजप-शिंदे गटात चुरशीची लढत सुरू आहे.


आत्तापर्यंत भाजप- शिंदे गटाला ६३८, मविआ ५२४ आणि अन्य २५८ ठिकाणी विजयी झाले आहेत. भाजपने ४०४ तर शिंदे गटाने २३४ ठिकाणी दणदणीत विजय मिळवला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यातील ३२ ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या.


वेंगुर्ले तालुक्यातील चिपी ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत.


रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. टेंभ्ये ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा फडकला आहे. ठाकरे गटाचे अशोक नागवेकर विजयी झाले असून शिंदे गटाच्या महाला आघाडी तालुका प्रमुख कांचन नागवेकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तब्बल ३०० मतांनी पराभव झाला आहे. शिंदे गटासाठी टेंभ्ये ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.


दापोली तालुक्यात शिंदे गटाचे आमदार योगेश रामदास कदम यांचा दबदबा कायम आहे. १४ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा विजय झाला आहे. तर माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या वेळवी गावात आणि कळंबट ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे आहे. वेळवी सरपंचपदी रणजीत रंजन दळवी २६९ मतं मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मनोहर दिनकर दळवी यांना १४७ मतं मिळाली.


इंदोरीकर महाराजांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदावर विजय मिळवला आहे.

दापोली तालुक्यातील आपटी सरपंचपदी संपदा संदिप आंग्रे विजयी झाल्या आहेत. २४४ मतं मिळवून त्याचा निसटता विजय झाला. प्रतिस्पर्धी कीर्ती किसन गायकवाड यांना २४० मतं मिळाली. तर नोटाला ३ मतं मिळाली.


उसगाव सरपंचपदी मृदुला मिलिंद गोयथळे ३७१ मतं मिळवून विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी अनुष्का अरविंद महाडीक यांना १६४ मतं मिळाली.


कादिवली सरपंचपदी प्रमोद प्रताप माने २१० मतं मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी मा़ंडवकर रविंद्र श्रीपत यांना १५४ मतं मिळाली. तर महाडिक दिनाद शांताराम यांना ९७ मतं मिळाली.


करंजाणी सरपंचपदी साळवी लहू रामचंद्र २९८ मतं मिळवून विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी साळवी नितीन नारायण यांना ९९ मतं मिळाली.


कुडावळे सरपंचपदी प्रमोद अनंत कदम यांचा ३२५ मतं मिळवून निसटता विजय झाला. प्रतिस्पर्धी अजित जनार्दन कदम यांना ३२० मतं मिळाली. त्यांचा केवळ ५ मतांनी पराभव तर संदिप शंकर पवार यांनी १२५ मतं मिळवली आणि राजेंद्र बाबु विचारे यांना २५ मतं मिळाली.


सातेरे तर्फे नातू सरपंचपदी राजेंद्र सहदेव पेडणेकर १९१ मतं मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी सूर्यकांत पांडुरंग यादव यांना १०९ मतं मिळाली.


सडवे सरपंचपदी रमेश महादेव टेमकर, शिर्दे सरपंचपदी केंबळे बलवंत धोंडू, कळंबट सरपंचपदी साक्षी जनार्दन महाडीक, तर हाय व्होल्टेज जालगाव ग्रामपंचायत सरपंचपदी १८५९ मतं मिळवून अक्षय फाटक विजयी झाले आहेत.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग