नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये २४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नंबर वन ठरली आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी ७,६८२ ग्रामपंचायतींतील ६५,९१६ सदस्यांसाठी मतदान झाले. त्यातील १४,०२८ सदस्य बिनविरोध निवडून आले. सरपंचपदासाठी ७६१९ जागांसाठी मतदान झाले. त्यातील ६९९ जणांची बिनविरोध निवड झाली. ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. रात्री उशिरापर्यंत अंतीम मतमोजणी झालेली नव्हती. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार या निवडणुकांमध्ये भाजपा तसेच बाळासाहेबांची शिवसेना, यांनी बाजी मारली. या निवडणुका राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर लढविल्या जात नाहीत. परंतु निवडून येणारे कार्यकर्ते कोणत्या पक्षांचे आहेत, यावर त्या-त्या पक्षांकडून ग्रामपंचायती तसेच सरपंचपदावर दावा केला जातो.
संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीत भाजपाने २०२३, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७७२, ठाकरे यांच्या शिवसेनेने ६३९, राष्ट्रवादी काँग्रेसने १२१५, काँग्रेसने ८६१ तर इतर पक्षांनी १,१३५ जागा जिंकल्या. तर सरपंचपदासाठी भाजपाने १४२२, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७०९, ठाकरे यांच्या शिवसेनेने ५७१, राष्ट्रवादी काँग्रेसने ९८७, काँग्रेसने ६०७ तर इतर पक्षांनी ८८७ जागा जिंकल्या.
उपलब्ध आकडेवारी ध्यानात घेता भाजपाचा दणदणीत विजय झाल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना आता महाराष्ट्रातही त्यांच्या विचारांच्या सरकारचे काम राज्यातील जनतेला पसंत पडले आहे. राज्यातील ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा-पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला पसंती दिली आहे. याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही युती विजयी होईल. तसेच महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत शहरी मतदारही भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल देईल याची खात्री आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…