Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडी

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ११ पोलिसांचे निलंबन

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ११ पोलिसांचे निलंबन

पिंपरी चिंचवड : चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर काल शाईफेक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. आता या घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात पडले आहेत.


या घटनेनंतर ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती.

Comments
Add Comment