पिंपरी : आकुर्डी येथे अगरबत्ती तयार करण्याच्या कारखान्याला आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग (Pimpri Fire) लागली. शाळेला लागून असलेल्या या कारखान्यातील आगिने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. त्यामुळे शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.
पांढरकर नगर आकुर्डी येथील लोहमार्गाच्या अगरबत्तीच्या कारखान्याला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील पत्रा शेड ची काही घरांना त्याच्या झळा बसून मोठे नुकसान झाले. शाळेजवळ आग लागल्याची माहिती मिळतात विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे लोट आणि धूर मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली. मात्र अग्निशामक दल पोलीस आणि महापालिका अधिकारी यांच्याकडून दिलासा दिला जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…