नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या तापमानामध्ये तीन अंशांनी वाढ झाली आहे, त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसातही उष्णतेचा परिणाम (Effect of heat) जाणवू लागला आहे. त्यामुळे जनजीवनावरदेखील त्याचा परिणाम दिसून येत आहे.
सर्वसाधारण दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते आणि नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते. तर या काळामध्ये म्हणजेच डिसेंबर व दत्त जयंतीच्या काळात प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रात थंडी पडलेली असते. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यावर्षी चांगली जोरदार थंडी पडेल, असा अंदाज बांधला जात होता. हवामान तज्ञदेखील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करत होते.
परंतु उत्तर भारताकडून वाहणारे थंड वारे हे तापमानातील बदलामुळे संथ गतीने वाहत आहेत, असे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम तापमानामध्ये वाढ होण्यामध्ये दिसून येत आहे. नाशिक शहराच्या तापमानात मागील २४ तासात तीन अंश डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. नाशिक शहराचे कमाल तापमान १८.८ तर कमाल तापमान ३१.३ हे मागील २४ तासात नोंदविण्यात आले आहे. तर या महिन्यातील सर्वात जास्त तापमान हे परवा शनिवारी नोंदविण्यात आले.
शनिवारी १५.४ किमान तर कमाल ३०.४ अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर ही मोठी वाढ झाली असल्यामुळे अचानक थंडीच्या दिवसांमध्ये देखील उष्णतेचा माहोल तयार झालेला आहे. याचा परिणाम जनजीवनावर होताना दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये पुन्हा थंडीचे संकेत मिळत आहेत. रोमन तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारताच्या पूर्व आणि पूर्व दक्षिण उत्तर पश्चिम भागात बहुतांशी ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत, त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…