Tuesday, July 16, 2024

अभ्यास

परमार्थातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा भ्रम येतो कुठून व त्याला जबाबदार कोण? काही लोक असेही म्हणतात की, ‘चाले हे शरीर कुणाचिये सत्ते’ या उक्तीनुसार आम्ही जे बोलतो¸, आम्ही जे करतो, ते सर्व देवाच्या सत्तेने. मग आम्ही दारू पितो ते त्याच्याच सत्तेने¸. एकमेकांची डोकी फोडतो, ती त्याच्याच सत्तेने. या ठिकाणी हा असा गोंधळ आहे. हा गोंधळ दूर झाला नाही, तर संसार बिघडतो व परमार्थ वाया जातो. ‘ना संसार ना परमार्थ’ अशी स्थिती होते. या गोष्टी सद्गुरूंशिवाय कळत नाहीत. सद्गुरूंकडून नुसते कळून उपयोग नाही, तर त्यासाठी अभ्यास करावा लागतो, चिंतन करावे लागते. पुन्हा पुन्हा सद्गुरूंचे ऐकावे लागते.

लोक म्हणतात, तेच तेच काय ऐकायचे. एकतर ते तेच तेच नसते व दुसरे म्हणजे तेच तेच ऐकणे याला अभ्यास म्हणतात. दररोज डाळभात खाता की नाही? तेव्हा तेच तेच काय खायचे, असे म्हणता का? बायको तीच तीच असते. नवरा तोच तोच असतो मग काय सोडता. ज्याला काही करायची नसते ना तो काहीतरी कारणे सांगतो. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे यालाच अभ्यास म्हणतात. पुन्हा पुन्हा ऐकणे हे सुद्धा ‘रिव्हीजन’आहे. ‘रिव्हीजन’नसेल, तर ‘व्हिजन’ येणार कुठून?Æ लोक इतके अज्ञानी आहेत की, स्वतःला मोठे ज्ञानी समजतात. गुरू केला पाहिजे म्हणतात. प्रत्येक गोष्टीत गुरू लागतो. आई ही पहिली गुरू असते. पण आईच जर अडाणी असेल, तर वाट लागते. आई जर तंबाखू खाणारी असेल, तर मूल काय करणार. मुले कशी असतात?Æ ते जे ऐकतात, ते जे पाहतात त्याचेच संस्कार त्यांच्यावर जास्त होतात. जे ऐकतात ते तुम्ही बोलतात तसेच मुले हीसुद्धा तुम्ही जे बोलतात ते ऐकतात व त्याप्रमाणे बोलतात. आपण इंग्लिमध्ये बोलतो, तर तीही इंग्लिमध्ये बोलतात. तुम्ही मराठीत बोला ती मराठीत बोलतील. हा सर्व विषय समजून घेतला पाहिजे. या विषयांत अनेक क्लिष्टता आहेत.

‘वणेचि मोक्ष मिळे आयता’ असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात¸, ‘नको सोडू अन्न, नको सेवू वन चिंती नारायण सर्व भोगी’. पण नारायणाचे चिंतन करायचे म्हणजे कुणाचे करायचे?Æ म्हणूनच तुकाराम महाराजच सांगतात¸, ‘सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी’. आता सद्गुरूंचे पाय धरायचे की न धरायचे हे तू ठरव.¸ कारण ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…

– सद्गुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -