Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

water supply : मुंबईत काही भागांत पाणीपुरवठा बंद, तर काही भागांत कमी दाबाने

water supply : मुंबईत काही भागांत पाणीपुरवठा बंद, तर काही भागांत कमी दाबाने

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने मंगळवार २९ ते बुधवार ३० नोव्हेंबर या २४ तासांसाठी पाणीकपात (water supply) जाहीर केली आहे, यामुळे मुंबईतील साधारण विभागात पाणीपुरवठा बंद, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


मंगळवार सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाणी कमी दाबाने आणि बंद असणार आहे.


महापालिकेकडून पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलिमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलिमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलिमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर बाय १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.


यादरम्यान २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे तसेच के/पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील.


के/पूर्व, जी/उत्तर, पी/दक्षिण विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, तर एच/पश्चिम विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल व काही परिसरात ३० नोव्हेंबर २०२२ पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.


नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment