नवी मुंबई ( प्रतिनिधी) : नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ (Mansarovar Railway Station) दुचाकींना आग लागली. या आगीत पार्किंगमधील तब्बल ४२ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात आणली जात आहे. परंतु, या भीषण आगीत गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानका बाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना ही आग लागली. आगीत पार्किंमध्ये उभा करण्यात आलेल्या ४२ गाड्या जळून खाक झाल्या असून समाजकंटकाकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
मुंबईमध्ये कामासाठी येणारे लोक मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर आपल्या दुचाकी पार्क करतात. आज देखील नेहमी प्रमाणे येथे दुचाकी पार्क करून अनेक जण कामावर गेले होते. परंतु, सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास या पार्किंगमध्ये आग लागली. ही आग एवढी भीषण होती की पार्किंगमधील अनेक दुचाकी या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत या दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.
मुंबई: रीलस्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीला आला…
पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले…
मुंबई : महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला…
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…