water taxi : बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत!

अलिबाग (वार्ताहर) : बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी (water taxi) लाँचसेवा शनिवार २६ नोव्हेंबरपासून सुरु होत असल्याने अलिबागकरांना आता नवी मुंबईला केवळ सव्वा तासात पोहचता येणार आहे. यासाठी प्रवाशांना तिकिटापोटी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. ही सेवा सुरुवातीला केवळ शनिवार आणि रविवारसाठीच असणार आहे.


नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवेत दाखल झाली. ही वॉटर टॅक्सी अन्य मार्गांवरही चालविण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला असून, ही सेवा बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. बेलापूर ते गेटवे ऑफ दरम्यान वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे सागरी मंडळाने बेलापूर ते मांडवा मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


शनिवार, २६ नोव्हेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार असल्याची माहिती नयनतारा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बेलापूर जेट्टी येथून सकाळी आठ वाजता ही वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडव्याला पोहोचेल. तर संध्याकाळी सहा वाजता मांडव्यावरून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूरला पोहोचेल. सध्या नवी मुंबईतून अलिबागला पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. पण या वॉटर टॅक्सीमुळे बेलापूर - मांडवा अंतर केवळ सव्वा तासात पार करता येणार आहे. या सेवेसाठीच्या ऑनलाइन बुकिंगला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय उत्खनन?

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात सध्या सुरू असलेल्या बॉक्साइट उत्खननाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या

थंडीच्या कडाक्याने आंबा मोहरला

उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित; बागायतदारांच्या आशा पल्लवित अलिबाग : कडाक्याच्या थंडीमुळे आंबा कलमांना मोहर

जिल्ह्यात दहा नगर परिषदांमध्ये धक्कादायक निकाल

प्रस्थापितांना मोठा दणका सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यावर नगर

रोडपालीत शेकापचा ‘गड’ ढासळला

प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच

उरणच्या करंजा बंदराच्या कायापालटासाठी ७० कोटींची तरतूद

गाळाचा प्रश्न सुटणार, खासदार श्रीरंग बारणेंचा पाठपुरावा अलिबाग : उरण तालुक्यातील करंजा मच्छीमार बंदरात साचलेला

खोपोली नगर परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व

नगराध्यक्षपदी कुलदीपक शेंडे; राष्ट्रवादी बॅकफूटवर खोपोली निवडणूक चित्र सुभाष म्हात्रे खोपोली : खोपोली नगर