नवी मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबईत सध्या भटक्या कुत्र्यांबरोबर मांजरांची (Stray cats) संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरांचीही नसबंदी केली जाणार आहे. मांजरांकडून कोणताही उपद्रव नसलातरी त्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते.
भटक्या मांजराची नसबंदी करण्याबाबतचे काम सध्या कार्यप्रणालीमध्ये असून नव्या वर्षात प्रत्यक्षात या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. नवी मुंबई महापालिका यापुढे श्वानांबरोबरच मांजरांचीही नसबंदी मोफत करणार आहे. याआधी मुंबई त्यापाठोपाठ पुण्यासह इतरही महापालिका हद्दीतील भटक्या मांजरांच्या नसबंदी केली जात आहे. त्यानुसार २०२३ पासून नवी मुंबईतदेखील भटक्या मांजराची नसबंदीला सुरुवात होणार आहे.
मांजरांचा फारसा उपद्रव नसतो म्हणून त्यांच्या नसबंदीची आवश्यकता सरकारी यंत्रणांना आतापर्यंत वाटत नव्हती. पिलावळ वाढत असल्याने मांजरांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाकडे कोणाचेही लक्ष जात नव्हते. याबाबत मुंबईत राहणाऱ्या प्रा. सोफी जग्गी यांनी मांजरांच्या हक्कासाठी अक्षरश: लढा दिला आणि सरकारी यंत्रणेला निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यानुसार मुंबईत २०१९ पासून भटक्या मांजरांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे भटक्या मांजरांची संख्या आटोक्यात येईल, असा विश्वास ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनकडून व्यक्त केला जात आहे.
तसेच दर तीन महिन्यांनी मांजर चार ते पाच पिल्लांना जन्म देते. त्यानुसार त्यांची संख्या खूप वाढल्यामुळे त्यांची उपासमार होते. मांजरांच्या रडण्याला आणि विव्हळण्याला कंटाळून अनेक ठिकाणी मांजरांना शारीरिक इजा केली जाते, त्यांचा जीवही घेतला जातो. अनेकदा ती गाड्याखाली येतात. त्यामुळे त्यांची नसबंदी करून संख्या आटोक्यात आणली जाईल. नवी मुंबईत झालेल्या १९व्या पशुगणनेनुसार ३० हजार पाळीव, भटके प्राणी आहेत. गेल्या काही वर्षांपासून मांजराचे प्रमाण वाढल्याचा अंदाज पशुवैद्यकीय विभागामार्फत वर्तवला जात आहे. तसेच मानवी वस्तीजवळच आढळणाऱ्या मांजरांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण वाढले असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली.
मांजरी भटक्या श्वानांपेक्षा आक्रमक नाहीत. मात्र लहान पिल्ले इमारतींमधील जिन्यात अथवा अडगळीच्या जागेत घेऊन त्या बसतात. अशा वेळेस त्यांच्यावर पाय पडल्यास मांजरीकडून हल्ला होण्याची भीती असते. अन्य तक्रारीही नागरिकांनी पालिकेकडे केल्या आहेत. तसेच लहान मुले मांजरांच्या पिल्लांना खेळवतात खेळता खेळता पिल्ले आक्रमक होऊन चावा घेण्याच्याही घटना घडल्या आहेत.
भटक्या श्वानांप्रमाणे भटक्या मांजराचीदेखील नसबंदी केली, जाणार असून सदर काम हे कार्यप्रणालीत आहे. यासाठी बजेटमध्ये तरदूत केली जाणार आहे. २०२३ पासून नसबंदीला सुरुवात होणार आहे.– डॉ. श्रीराम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…