Friday, June 20, 2025

Bronze medal : रायगड पोलीस दलातील दोघांना कांस्य पदक

Bronze medal : रायगड पोलीस दलातील दोघांना कांस्य पदक

अलिबाग (वार्ताहर) : रायगड पोलीस दलातील दोघांनी पदक (Bronze medal) जिंकण्याची कामगिरी केली आहे. पोलीस नाईक राजेंद्र चंद्रकांत गाणार यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. पोलीस नाईक अमित वासुदेव पाटील यांनीही जलतरण स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.


राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ व २ पुणे येथे ७१वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर - २०२० पुरुष शरीरसौष्ठव अंतिम निवड चाचणी स्पर्धा नुकतीच पार पाडली. या स्पर्धेमध्ये रायगड पोलीस दलातील पोलीस नाईक राजेंद्र चंद्रकांत गाणार यांनी कांस्य पदक पटकाविले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग येथे पार पडलेल्या चौथी सी/चॅनेल स्विमिंग २०२२ स्पर्धेत रायगड पोलीस दलातील पोलीस नाईक अमित वासुदेव पाटील यांनीही कांस्य पदक जिंकले. रायगड पोलीस दलातर्फे दोन्हीही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >