school : राज्यातील ३ विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना वर्ष २०२१-२२ च्या ‘स्वच्छ विद्यालय (school) पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने नुकतेच ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’चे आयोजन केले होते. या प्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्रातील तीन विद्यालयांची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्लिक स्कूल या विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रातिनिधिक म्हणून त्या-त्या शाळेंचे विद्यार्थीही पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राचार्यांसोबत उपस्थित होते.


या पुरस्कारातंर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हाथ धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-१९ च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मुल्यांकन झाले.


केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे वर्ष २०१६-१७ पासून स्वच्छता विद्यालय पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. वर्ष २०२१-२२ च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी देशभरातील एकूण ३९ शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये ३४ विद्यालयांची निवड, तर उपश्रेणींमध्ये ५ विद्यालयांची निवड करण्यात आली. या अंतर्गत १७ प्राथमिक आणि २२ माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. तसेच निवड झालेल्या विद्यालयांमध्ये २१ शाळा ग्रामीण भागातील, तर १८ शाळा या शहरी भागातील आहे. या विद्यालयांमध्ये २८ शाळा अनुदानीत, ११ शाळा खासगी, २ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, १ नवोदय विद्यालय आणि ३ केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व