नवी दिल्ली : ट्विटरचे (Twitter) नवीन मालक एलॉन मस्क यांनी जबाबदारी स्वीकारताच, या प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुनर्संचयित करण्याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यासाठी त्यांनी शनिवारपासून मतदानालाही सुरुवात केली. रविवारी मतदान संपल्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा दिसले, मात्र बहुमतानंतरही आता ट्विटरवर परतण्यात रस नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी स्पष्ट केले.
ट्वीटरचे मालक एलॉन मस्क यांनी १९ नोव्हेंबर रोजी ट्वीट करत डोनाल्ड ट्रंप यांचे ट्वीटर अकाउंट पुर्ववत सुरू करण्याबाबत लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. त्यासाठी त्यांनी पोल द्वारे ‘हो किंवा नाही’ मध्ये उत्तर मागितले होते. त्यावर पन्नासहून अधिक टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले होते. त्यामुळे आता डोनाल्ड यांचे ट्वीटर अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रक्षोभक ट्विटमुळे जानेवारी २०२१ मध्ये ट्विटरवरील त्यांच्या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती.
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…
मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…