किव्ह (वृत्तसंस्था) : रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये ऊर्जा संकट (Energy crisis) निर्माण झाले आहे. रशियाने युक्रेनमधील ऊर्जा प्लांटला निशाणा बनवल्याने युक्रेनमध्ये ऊर्जा संकट गडद झाले आहे.
दशलक्ष लोकांना विजेशिवाय अंधारात जगावे लागत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नुकतेच सांगितले की, अनेक शहरांमध्ये लोकांना विजेअभावी अंधारात राहावे लागत आहे.
रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. रशियाने युक्रेनमधील न्यूक्लिअर प्लांटवर हल्ले केले. यामुळे युक्रेनमधील ऊर्जा पुरवठा बाधित झाला आहे. परिणामी अनेक लोक सध्या विजेशिवाय अंधारात आहेत. झेलेन्स्की यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, सध्या युक्रेनमध्ये १० दशलक्ष नागरिक वीज नसल्याने अंधारात आयुष्य जगत आहेत. दरम्यान झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या नागरिकांना ऊर्जा प्रवाह पुन्हा सुरू करण्यात येईल असे सांगितले आहे.
Ajit Agarkar : निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आगरकरचे नाव आघाडीवर?
युक्रेन आणि रशिया या देशांमधील संघर्ष अद्यापही सुरुच आहे. या युद्धाला आता नऊ महिने पूर्ण होतील. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला करत या युद्धाला सुरुवात केली होती. तेव्हापासून रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरुच आहेत. युक्रेनमधील शहरांसह देशाला ऊर्जा पुरवणाऱ्या प्लांटवर सुद्धा रशियाकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. रशियाने युक्रेनमधील ऊर्जा प्लांटला निशाणा बनवल्याने युक्रेनमध्ये ऊर्जा संकट गडद झाले आहे. दशलक्ष लोकांना विजेशिवाय अंधारात जगावे लागत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नुकतेच सांगितले की, अनेक शहरांमध्ये लोकांना विजेअभावी अंधारात राहावे लागत आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रशियाने युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे अनेक ऊर्जा प्लांट आणि इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. युक्रेन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील झापोरिझिया शहराजवळील विल्निस्क येथील अपार्टमेंट ब्लॉकमध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. यामध्ये सात जण ठार झाले आहेत.
युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, पूर्वेकडील गॅस उत्पादन प्रकल्प आणि डनिप्रोमधील क्षेपणास्त्र कारखाना हे रशियाच्या निशाण्यावर होते. वीजनिर्मिती प्रकल्पावर हल्ला झाल्यामुळे वीज पुरवठा प्रभावित होऊन कमी झाला आहे. परिणामी वीज कपातीमुळे युक्रेनची राजधानी किव्ह, पश्चिमेकडील विनितसिया, नैऋत्येकडील ओडेसा बंदर शहर आणि ईशान्येकडील सुमी येथील लोकांना फटका बसला असून त्यांना अंधारात राहावे लागत आहेत.