MNS : सावरकरांबद्दलच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक

मुंबई (वार्ताहर) : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.


काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. मात्र यात्रेदरम्यान राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा अकोल्यात बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.


या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसेचे कार्यकर्ते शेगावला जाणार आहेत.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा